सुवर्णनगरी जेजुरी
                                             महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश खंडोबा मंदिरे 
महाराष्ट्रात मल्हारी, म्हाळसाकांत, या नावाने हि खंडोबा ओळखला जातो. कर्नाटकात मैलार, मल्लया, मैलारलिंग, मालतेश, या नावानी तो ओळखला जातो. तर आंध्रप्रदेशात मल्लाना, मलिकार्जुन या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक. आंध्रप्रदेश यांचा प्रदेश खंडोबाच्या असंख्य मंदिरांनी भरलेला आहे.
शेकडो वर्ष या देवाचे भक्त त्याचे दुसरया प्रांतातील रूपा पासून अपरिचित होते, तरीही त्यांचे भक्ती मार्गातील अनेंक दुव्यात साम्य कायम राहिले. त्याचे भक्ती मार्गाचे कोणीही मोठे प्रसारक झाले नाहीत. तरीही यांचा भक्ती संप्रदाय बहरत राहिला तो येथील जनसामान्यांचे भक्तीतून, असा हा खरा लोकदेव.
महाराष्ट्र, कर्नाटक. आंध्रप्रदेश या तिन्ही प्रदेशात खंडोबाची अनेक मंदिरे लहान मोठे उत्सव आणि यात्रानी गजबजलेली आहेंत. यातील मोठ्या यात्रा भरणारी व खंडोबाच्या चरित्राशी निगडीत असणारी मंदिरे प्रमुख मानली जात्तात.

महाराष्ट्र

 कर्नाटक

 आंध्रप्रदेश

 


हि यातील काही प्रमुख मंदिरे. या आणि इतर अनेक खंडोबा मंदिरांचे हे सचित्र दर्शन.